Chandrakant Bawankule - Raigad Revenue Review
Chandrakant Bawankule - Raigad Revenue Review

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी महसूल, मुद्रांक व भूमिअभिलेख विभागाचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ९५० शेतरस्त्यांना सांकेतिक क्रमांक देऊन ३१ मार्च २०२७ पर्यंत सर्व रस्ते खुले करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच डिसेंबर २०२७ पर्यंत या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करून त्यांचे संरक्षण करण्यावर भर देण्यात आला.

Chandrakant Bawankule - Raigad Revenue Review
Chandrakant Bawankule – Raigad Revenue Review

बैठकीत १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जागांवरील पात्र अतिक्रमणधारक तसेच २०२४ पूर्वीच्या १५ हजार चौरस फुटांपर्यंतच्या पात्र खासगी बांधकामांना सर्वेक्षणानंतर स्वामित्व हक्क देण्याची प्रक्रिया गतीने राबविण्याचे आदेश देण्यात आले.

प्रलंबित मोजणीची कामे १५ दिवसांत पूर्ण करणे, न वापरल्या जाणाऱ्या औद्योगिक जमिनींचा आढावा घेऊन आवश्यक कारवाई करणे आणि महसूल विभाग अधिक गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख करण्याच्या सूचनाही यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी दिल्या.

Raigad Revenue Review

Google search engine
Previous articleअलिबाग पोलिसांची मोठी कारवाई; 4 कोटी रुपये किमतीचे अंबरग्रीस (Ambergris) जप्त; आरोपी ताब्यात
Next articleDhangar Gajanrutya: धनगर समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचा अभिमान असणाऱ्या गजनृत्याला शासकीय मान्यता मिळण्यासाठी धनगर समाजाची 12 आग्रहाची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here