रायगड पोलिसांचा निष्ठावान श्वान ‘ऑस्कर’ काळाच्या पडद्याआड
रायगड पोलिस दलातील अत्यंत निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष श्वान ‘ऑस्कर’ याचे निधन झाले आहे. सात वर्षांच्या सेवाकाळात ऑस्कर ने तब्बल १९४ गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यास पोलिसांना मोलाची मदत केली.

आपल्या उत्कृष्ट घ्राणशक्ती, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेमुळे ऑस्करने रायगड पोलिस दलाचा गौरव वाढवला. त्याच्या निधनामुळे पोलिस दलाने एक विश्वासू सहकारी गमावला असून, सर्व स्तरातून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

कर्तव्याला आयुष्य समर्पित करणाऱ्या या वीर योद्ध्याच्या कार्याची आठवण कायम स्मरणात राहणार आहे.









