Protest
Protest

‘दि. बा. ची वारी, दिल्लीच्या दारी’; विमानतळ नामकरणासाठी ५ ऑगस्टला जंतर-मंतरवर आंदोलन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आता लढा थेट दिल्लीत पोहोचणार आहे.

Protest
Protest

येत्या ५ ऑगस्ट रोजी जंतर-मंतर येथे २७ गाव संघर्ष समिती (27 Gaon Sangharsh Samiti) यांच्या माध्यमातून एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांनी दिली. या आंदोलनासाठी एक हजार जणांना परवानगी मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

Protest
Protest

“दि. बा. ची वारी, दिल्लीच्या दारी” अशी घोषणा देत केंद्र सरकारपर्यंत स्थानिकांच्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Delhi Protest
Protest

तसेच पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur) यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले असून, त्यांच्या निर्णयाचे बाळाराम पाटील (Balaram Patil) यांनी स्वागत केले.

Google search engine
Previous articleAmba Ghat: आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी पूर्ण बंद; रस्त्याला भेगा; अवजड वाहनांवर तातडीची बंदी, पर्यायी मार्ग जाहीर
Next articleVegetable Exhibition: सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांचा अनोखा गावठी बाजार; रानभाज्यांचा जागर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here