Ambergris
Ambergris

अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई…

रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलिसांनी किनारपट्टी सुरक्षा गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत सुमारे चार कोटी रुपये किमतीचे अंबरग्रीस जप्त केले आहे.

चाळमाळा जेटीजवळ संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका दुचाकीस्वाराची तपासणी केली असता त्याच्याकडून सुमारे चार किलो वजनाचे अंबरग्रीस (ambergris) आढळून आले.

Ambergris
Ambergris

या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडील दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत हा गंभीर गुन्हा असल्याने आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

समुद्रकिनारी किंवा अन्यत्र अंबरग्रीस आढळल्यास त्याची बाळगणूक, वाहतूक किंवा विक्री न करता तात्काळ पोलीस किंवा वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.

Google search engine
Previous articleAlibag Hospital Case: प्रसूतीतील हलगर्जीप्रकरणी डॉक्टरांवर 304-A अंतर्गत गुन्हा
Next articleRaigad Revenue Review: रायगड महसूल विभागाचा आढावा; शेतरस्ते, मोजणी आणि स्वामित्व योजनांना गती – चंद्रकांत बावनकुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here