Alibag Hospital Case
Alibag Hospital Case

प्रसूतीतील हलगर्जीप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा (Alibag Hospital Case)

अलिबाग जिल्हा रुग्णालयातील २०२२ मधील नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. सर जे. जे. समूह रुग्णालय, मुंबई येथील पाच वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या अहवालानंतर प्रसूती विभागातील डॉ. प्रियल रविंद्र शेंडे (Dr. Priyal Ravindra Shende) यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०४-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alibag Hospital Case
Alibag Hospital Case

प्रसूतीदरम्यान ऑन-ड्युटी असूनही डॉक्टर वेळेवर उपस्थित न राहिल्याने आवश्यक उपचार मिळाले नाहीत आणि त्यामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष समितीने नोंदविला आहे.

पीडित सुष्मिता काटले (Sushmita Katale) यांनी या कारवाईबद्दल अलिबाग पोलिसांसह जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल (Anchal Dalal) आणि जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञ समितीचे आभार मानले आहेत.

दरम्यान, गुन्हा दाखल होऊनही संबंधित डॉक्टरांना अद्याप अटक न झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांत कठोर कारवाईची मागणी पुन्हा जोर धरत आहे.

Google search engine
Previous articleरायगड पोलिसांचा निष्ठावान श्वान ‘ऑस्कर’ (Oscar) काळाच्या पडद्याआड; 194 गुन्ह्यांच्या तपासात मोलाची कामगिरी
Next articleअलिबाग पोलिसांची मोठी कारवाई; 4 कोटी रुपये किमतीचे अंबरग्रीस (Ambergris) जप्त; आरोपी ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here