Chiplun Road Potholes
Chiplun Road Potholes

चिपळूण, रत्नागिरी

चिपळूण शहरातील अहिल्या जनरल स्टोअर (Ahilya General Store) समोरील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Chiplun Road Potholes
Chiplun Road Potholes

पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी वाहने अडकण्याचे प्रकार घडत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे.

Chiplun Road Potholes
Chiplun Road Potholes

या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार चिपळूण नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे तसेच सातपुते (Satpute) यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचा दावा केला आहे.

Chiplun Road Potholes
Chiplun Road Potholes

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) अपंग कल्याण विभागाचे शहराध्यक्ष राजेश रामचंद्र सुर्वे (Rajesh Ramchandra Surve) यांनीही अनेकदा या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Chiplun Road Potholes

त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Google search engine
Previous articleVegetable Exhibition: सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांचा अनोखा गावठी बाजार; रानभाज्यांचा जागर
Next articleAnjanari Ghat Truck Fire : अंजणारी घाटात ट्रकला भीषण आग. चालक व क्लिनर जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here