‘दि. बा. ची वारी, दिल्लीच्या दारी’; विमानतळ नामकरणासाठी ५ ऑगस्टला जंतर-मंतरवर आंदोलन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आता लढा थेट दिल्लीत पोहोचणार आहे.

येत्या ५ ऑगस्ट रोजी जंतर-मंतर येथे २७ गाव संघर्ष समिती (27 Gaon Sangharsh Samiti) यांच्या माध्यमातून एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांनी दिली. या आंदोलनासाठी एक हजार जणांना परवानगी मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

“दि. बा. ची वारी, दिल्लीच्या दारी” अशी घोषणा देत केंद्र सरकारपर्यंत स्थानिकांच्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur) यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले असून, त्यांच्या निर्णयाचे बाळाराम पाटील (Balaram Patil) यांनी स्वागत केले.









