खेड, रत्नागिरी
JCI Khed – आंबये येथे मोफत आरोग्य शिबिर; 93 लाभार्थ्यांची तपासणी
जेसीआय खेड (JCI Khed) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे (Primary Health Centre Jamge) यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी आंबये येथील मराठी शाळा, पाटीलवाडी येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ९३ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरामध्ये नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, कर्करोग तपासणी, एचआयव्ही चाचणी, शुगर व रक्तदाब तपासणी, आयुष्मान भारत कार्ड सेवा, आभा (ABHA) कार्ड नोंदणी, एएनसी/पीएनसी माता आरोग्य मार्गदर्शन तसेच लाभार्थ्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
याशिवाय महावीर एजन्सी (Mahavir Agency) चे अक्षत जैन (Akshat Jain) आणि शंकर पार्टे (Shankar Parte) यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना प्रोटीनचे डबे वाटप करण्यात आले. तसेच जेसीआय खेडच्या (JCI Khed) वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वितरण करण्यात आले.
या शिबिरात डॉ. नम्रता भुवड (Dr. Namrata Bhuvad), डॉ. आदित्य चिंदे (Dr. Aditya Chinde) आणि डॉ. ज्ञानेश्वर मारकड (Dr. Dnyaneshwar Markad) यांनी वैद्यकीय सेवा दिली.
कार्यक्रमाला जेसी शंकर पार्टे (JC Shankar Parte), शुभांगी ओसवानी (Shubhangi Oswani), सतीश येवले (Satish Yewale), शुभांगी हरावडे (Shubhangi Harawade), अस्मिता सकपाल (Asmita Sakpal), मनीषा निवाते (Manisha Nivate), शिल्पा दळवी (Shilpa Dalvi), मोरे मॅडम (More Madam), सावंत मॅडम (Sawant Madam), शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमाचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर जेसी शंकर पार्टे (JC Shankar Parte) यांनी नियोजन आणि समन्वयाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमासाठी JFM अमित नमुष्टे (Amit Namushte), अध्यक्ष, जेसीआय खेड (JCI Khed), JFM मधुर पेठे (Madhur Pethe), सचिव, जेसीआय खेड आणि जय पद्मिनी (Jai Padmini) यांचे मार्गदर्शन लाभले.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा, आरोग्याविषयी जनजागृती आणि विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत आयोजकांचे अभिनंदन केले.









