काल मध्यरात्री दिड वाजता श्री क्षेत्र हरिहरेश्वर परीसरात हॉटेल ममता मध्ये पुण्यातील फिरण्यासाठी आलेल्या काही तरूणांनी दारूच्या नशेत हॉटेल मालकाशी रूमचा रेट संदर्भात वाद घातला या वादाचे रूपांतर भानगडीत झाले.आणि या तरुणांनी हॉटेल मालक अभी धामणस्कर याला बेदम मारहाण करतं तेथून पळ काढला. मात्र पळ काढत असताना सोबत आणलेल्या स्कॉर्पिओ खाली हॉटेल मालक यांची बहीण ज्योती धामणस्कर या महिलेला देखील या पर्यटकांनी चिरडले आणि तेथून पळ काढला.मात्र पळ काढत असताना त्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे उर्वरित आरोपींची नावे देखील समोरं आली आहेत.आता श्रीवर्धन मधील पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत.मात्र हॉटेलच्या किरकोळ वादावरून एका महिलेचा या मध्ये मृत्यु झाल्याने श्रीवर्धन परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होताना दिसत आहे.आरोपींची नावे खालील प्रमाणे आकाश उपटकर, नीरज उपटकर, आकाश गावडे, आशिष सोनावणे, अनिल माज, विकी सिंग, सलीम नागुर, सचिन जमादार, आदिल शेख, इराप्पा धोतरे, सचिन टिल्लू – पुण्यातील रहिवासी आहेत