Roha School Fund
Roha School Fund

रोहा, रायगड

रोहा अष्टमी नगर परिषदेच्या शालेय इमारतीला ५ कोटींचा निधी

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोहा अष्टमी नगर परिषदेच्या डॉ. चिंतामणराव देशमुख शाळे (Dr. Chintamanrao Deshmukh School) चा कायापालट करण्यासाठी विकासकामे आणि नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी (Roha School Fund) मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या मंजुरीचे पत्र आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी प्रदान केले.

शाळा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सुविधांनी सुसज्ज व्हावी, या उद्देशाने खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी शाळेची पाहणी केली. यावेळी शाळेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधीही उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

रोहा अष्टमी नगर परिषदेचे शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सभापती रवींद्र चाळके (Ravindra Chalke) यांच्या पाठपुराव्यामुळे या निधीला मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. यावेळी रवींद्र चाळके (Ravindra Chalke) यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare), मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare), आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) तसेच नगराध्यक्षा वनश्री शेडगे (Vanshree Shedge) यांचे आभार मानले.

Roha School Fund

Google search engine
Previous articleKhopi Veralfata Road: खोपी–वेरळफाटा रस्त्याची दुरवस्था; कोट्यवधी खर्चानंतरही रस्ता नादुरुस्त
Next articleACB Trap: बोर्लीपंचतनमध्ये आरोग्य सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात; 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here