रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. मागच्या 12 तासांपासून रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रघुवीर घाट जोडतो.
रघुवीर घाटात दरड कोसळण्याची 15 दिवसातील तिसरी घटना समोर आली आहे. तसंच वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रतत्न केले जात असून मलबा हटवण्याचे युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. रघुवीर घाटात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना आहेत . रत्नागिरी-दक्षिण रत्नागिरीत सकाळपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे . सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . हवामान खात्याने आजही दिवसभर पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे . रत्नागिरी राजापूर लांजा संगमेश्वरमध्येही जोरदार पाऊस पडत आहे .अश्यात ही दरड कोसळली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे.त्यामुळे मागच्या 12 तासांपासून रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद आहे. रत्नागिरी जिल्हा आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रघुवीर घाट जोडतो. या घाटात दरड कोसळण्याची 15 दिवसातील तिसरी घटना समोर आली आहे. दरड कोसळण्याच्या या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील 20 गावांचा रत्नागिरी जिल्ह्या सोबत असलेला संपर्क तुटला आहे. सातारा जिल्ह्यातील 20 गावे रघुवीर घाटद्वारे जोडली जातात . तिथेच दरड कोसळली आहे. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी-दक्षिण रत्नागिरीत सकाळपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे .रत्नागिरी राजापूर लांजा संगमेश्वरमध्येही जोरदार पाऊस पडत आहे .








