खैर झाडांची बेकायदा कत्तल करून वाहतूक करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. पेण वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेल्या गागोदे परिमंडळ नाणेगाव वरवणे येथील वन सव्र्व्हे क्रमांक ५०३ मध्ये रात्री खैर झाडांची तोड करून वाहतूक करणाऱ्या सहा आरोपींना ९ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते. नाणेगाव वरवणे रस्त्याच्या वनविभागाच्या राखीव जागेत खैराची झाडे तोडत असताना तसेच वनविभागाच्या परिक्षेत्रातील नाणेगाव, वरवणे रस्त्यावर रात्री गस्त करत असताना झाडे तोडत असल्याचा आवाज झाला. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि खैराची झाडे तोडताना आरोपींना रंगेहाथ पकडले. वनक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर, वनरक्षक हनुमंत सूर्यवंशी यांनी सापळा रचून शासकीय वनात तोड करणाऱ्या सहा आरोपींना ताब्यात घेतले.