रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंगाने आचार संहितेचा काळात आमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर एनडीपीएस अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भात सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने १० नोव्हेंबर रोजी पेण मधून एकाला अटक करण्यात आले आहे.पेण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती दुचाकीने गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी म्हाडा कॉलनी येथे येणार आहे. या माहितीच्या पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि पेण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या दोन टिम तयार करून सापळा रचुन तो गांजा विक्री करणारा आरोपी दुचाकीवरून जात असतांना पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने दुचाकीचा स्पिड वाढवुन तो पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्या आरोपीस पकडून त्याच्याकडे असलेला १ लाख ७५ हजार ८४० रुपये किमतीचा गाजा हा आमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे .ही कारवाई पेण पोलीस ठाण्याचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपुत, पोलीस हवालदार कदम आदींनी केली. तर सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व पेण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपुत हे करीत आहेत.