महाड – ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक कामे सुरू आहेत मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची झालेली असल्याने स्थानिक नागरिकांमधून रायगड प्राधिकरणाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या शौचालयांमध्ये देखील पाणी नसल्याने शिवप्रेमींची गैरसोय होताना दिसत आहे. पाचाड गावामध्ये असलेल्या धर्म शाळेचे काम पूर्ण झाले असले तरी हे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. अद्याप या ठिकाणी अनेक कामे बाकी असल्याने धर्मशाळा देखील टाळे बंद करून ठेवलेली आहे. धर्मशाळेच्या एकूण दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. मात्र हे लाखो रुपये पाण्यात गेल्याची चर्चा स्थानिकांमधून उमटत आहे.