रत्नागिरी – सुमारे दोन महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या कोळीसरे कोठारवाडी येथील दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यात घडली आहे. रविवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घरातील वाश्याला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतला. संदीप जयवंत गोताड (वय 27) व त्याची पत्नी पूजा संदीप गोताड अशी त्यांची नावे आहेत. खंडाळा पोलिसांनी संदीप व त्याची पत्नी पूजा यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत.

Google search engine
Previous articleराज्यातला आणखी एक प्रकल्प निसटला ; सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला
Next articleरत्नागिरी जिल्हा काँग्रेसमध्ये अध्यक्ष बदलाचे वारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here