हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
यंदा सोमवार 26 सप्टेंबरपासून नवरात्री सुरू होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा सुरू होते.ज्योतिषाचार्य डाॅ. कृष्ण कुमार भार्गव यांनी नवरात्रीच्या घटस्थापना मुहूर्ताबद्दल माहिती दिली आहे.
सकाळी आहे सर्वोत्तम वेळ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 06.11 ते 07.42 पर्यंत चोघड्याचा अमृत मुहूर्त आहे. त्यामुळे सकाळी कलशाची स्थापना करणे खूप शुभ राहील.
नवरात्री 2022 तारीख
पंचांगानुसार अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी 26 सप्टेंबर रोजी पहाटे 03:23 ते 27 सप्टेंबर रोजी पहाटे 03:08 पर्यंत आहे. अशा परिस्थितीत 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे पूजन केले जाईल.
घटस्थापना स्थापना शुभ मुहूर्त 2022
शारदीय नवरात्रीच्या घटस्थापना किंवा कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.11 ते 07.51 पर्यंत आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी कलशाची स्थापना करता येत नसेल, तर तुम्ही ती अभिजीत मुहूर्तावर दुपारी 11.48 ते 12.36 या वेळेत करू शकता. अभिजीत मुहूर्त हा कलशाची स्थापना करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
महाष्टमीच्या दिवशी कन्यांची पूजा केली जाते आणि महानवमी किंवा दशमीला हवन केले जाते. मात्र अनेक ठिकाणी दुर्गा अष्टमीच्या दिवशी हवन केले जाते. जरी लोक पूर्ण 9 दिवस उपवास ठेवतात, तरी ते नवमी किंवा दशमीला हवन करतात आणि दसऱ्याच्या दिवशी पारण करतात.
नवरात्रीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाच्या स्थापनेनंतर दुर्गा देवीचे पहिले रूप शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. बहुतेक लोक या दिवशी नवरात्रीचा पहिला उपवास करतात. ज्यांना नवरात्रीचे 9 दिवस उपवास करता येत नाहीत, ते पहिल्या दिवशी आणि दुर्गा अष्टमीला उपवास करतात. याला नवरात्रीचे आरोह-अवरोह असे म्हणतात.