Maharashtra SSC Result 2022 Timing: महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या 15 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, पाच दिवसाच्या आत जाहीर होणार निकाल

- Advertisement -

Maharashtra SSC Class 10 Result: मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) १०वीच्या १५ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) निकाल (Result) जाहीर करण्याच्या तयारीत असून बोर्ड कधीही निकाल जाहीर करू शकते.

10वीचा निकाल झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाईल. बोर्डाने याबाबत कोणतीही घोषणा केली नसली तरी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या विधानाच्या आधारे ही शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर होईल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले होते. पण सर्व मीडिया रिपोर्ट्स अनुसार, निकाल हा २० जूनच्या आधी जाहीर होणं अपेक्षित आहे. त्याचवेळी, काही प्रसारमाध्यमांमध्ये असे देखील बोलले जात आहे की आज निकाल जाहीर केला जाऊ शकतो, परंतु सध्या तरी शिक्षणमंत्र्यांनी कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

महाराष्ट्रात एसएससीच्या परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत झाल्या. अनेक विरोधानंतरही, MSBSHSE ने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा आयोजित केल्या होत्या. मागील वर्षांप्रमाणे यंदा पेपरची वेळ आणि मूल्यांकन या दोन्ही निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे. मुंबईत सुमारे 373,740 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. दरवर्षी किमान २० लाख विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी करतात. ज्यामध्ये SSC आणि HSC दोन्ही परीक्षांचा समावेश आहे. मात्र, कोविड-19 महामारीमुळे महाराष्ट्र बोर्डाने गेल्या वर्षी परीक्षा घेतली नव्हती. त्याचवेळी काही वेळापूर्वी महाराष्ट्र बोर्डाने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला होता.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

12,546FansLike
75,569FollowersFollow
2,564FollowersFollow
191,558SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles