Dapoli : महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा; दापोलीला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दापोली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली.
या कार्यालयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व गतिमान होणार आहे. पालकमंत्र्यांच्या निर्णयानुसार जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यक्षेत्र विभागून नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यानंतर प्रशासकीय कामकाजाला गती मिळून नागरिकांना विविध शासकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.









