खेड: राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत राज्य शासनाने सुधारणा केली असून त्यानुसार अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आता दीड लाख रुपये दिले जाणार आहेत. आतापर्यंत अपघाती मृत्यू झालेल्या कुटूंबास ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती .

वाढलेली महागाई आणि अपघातांचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन सुधारित योजनेचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलं आहे. या योजनांतर्गत विदयार्थ्यांच्या कुटुंबीयांपैकी आई, आई हयात नसल्यास वडील किंवा विद्यार्थ्यांचे आई वडील हयात नसल्यास वडील हयात नसल्यास १८ वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण आदींपैकी एकाला हे अनुदान दिले जाते. त्यात विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपये, अपघातामुळे विद्यार्थ्याला कायमचे अपंगत्व दोन दिले किंवा दोन अवयव , एक डोळा किंवा एक अवयव असल्यास १ लाख रुपये, अपघातामुळे कायमचे अपंगत्व एक डोळा किंवा एक अवयव असल्यास ७५ हजार रुई, अपघातामुळे विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयांचा खर्च किंवा कमला १ लाख रुपये आजारी पडून , सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास प्रत्यक्ष रुग्णालयांचा खर्च किंवा कमला १ लाख रुपयेदिले जातील. सानुग्रह अनुदान योजनेचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक आणि मुख्याध्यापक , शिक्षणाधिकारी , गटशिक्षणाधिकारी ,शिक्षण निरीक्षक यांची असेल. योजनेचे प्रस्ताव निकाली काढण्याची प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे.

विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न करणे , आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्हयाच्या उद्देशाने कायदयाचे उल्लंघन करताना झालेला अपघात , नैसर्गिक मृत्यू किंवा मोटार शर्यतीतील अपघाताने मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व असल्यास विमा अनुदानाची रक्कम दिली जाणार नाही , असे स्पष्ट करण्यात आले आहे.

समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांची रक्कम संबंधित शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षकांनी एकाच हप्त्यात धनादेशाद्वारे लाभार्थीच्या खात्यात जमा करावी. समितीने प्रस्ताव नाकारल्यास संबंधित पालकांना लेखी कर्णासह कळवण्यात यावे असेही नमुना करण्यात आले आहे.

Google search engine
Previous articleमुंबईतील कांदिवली परिसरात आढळले 4 मृतदेह
Next articleमुंबई गोवा-महामार्गावरून जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here