ACB Trap
ACB Trap

ACB Trap: बोगस डॉक्टर प्रकरणात कारवाईची धमकी; बोर्लीपंचतनमध्ये आरोग्य सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

दिघी : बोगस डॉक्टर असल्याचे सांगून कारवाई करण्याची धमकी देत १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. (ACB Trap) ही कारवाई सोमवारी (३ ऑगस्ट) दुपारी श्रीवर्धन तालुक्यात करण्यात आली.

Borlipanchatan ACB Trap
Borlipanchatan ACB Trap

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तक्रारदाराविरुद्ध बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक घनश्याम बेलाजी कोमटवार (Ghanshyam Belaji Komatwar) यांनी कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती एसीबीने दिली.

ACB Trap

पडताळणीदरम्यान सुरुवातीची १० हजार रुपयांची मागणी कायम ठेवण्यात आली होती. मात्र, तडजोडीनंतर ५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेरील रस्त्यावर आरोपीने तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारून ती स्वतःच्या पँटच्या खिशात ठेवताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

कारवाईदरम्यान आरोपीच्या हातांवर व खिशावर अँथ्रासीन पावडरचे अंश आढळून आले. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.

ACB Trap ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड युनिटच्या पोलिस उपअधीक्षक सरिता आय. एस. भोसले (Sarita I. S. Bhosale) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अरुण करकरे (Arun Karkare), पोलीस हवालदार महेश पाटील (Mahesh Patil) आणि नवदित नांदगावकर (Navadit Nandgaonkar) यांनी सापळ्याची कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास अथवा भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास तातडीने विभागाशी संपर्क साधावा.

Google search engine
Previous articleRoha School Fund: रोहा अष्टमी नगर परिषदेच्या शालेय इमारतीला 5 कोटीचा निधी, आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून निधीच्या पत्राचे वितरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here