Savitri Bridge
Savitri Bridge

रायगड

Savitri Bridge: महाड सावित्री पुलावरील एक्सपान्शन जॉइंट दुभागल्याचा दावा; अपघाताचा धोका असल्याची प्रवाशांची चिंता

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड येथील सावित्री पुलावरील एक्सपान्शन जॉइंट दुभागल्याचा दावा करण्यात आला असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याची चिंता प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Savitri Bridge
Savitri Bridge

२०१६ मधील सावित्री पूल दुर्घटनेनंतर नव्या पुलाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, नव्या पुलावरील एक्सपान्शन जॉइंट वारंवार दुभागत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Savitri Bridge
Savitri Bridge

विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांसाठी या ठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पुलाची उभारणी करणाऱ्या संबंधित कंपनीने दुभंगलेल्या एक्सपान्शन जॉइंटची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

वेळेत दुरुस्ती न झाल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Google search engine
Previous articleAmboli Monsoon Marathon 2026: आंबोली मॅरेथॉनची दिमाखात सांगता; पर्यटन आणि निरोगी जीवनशैलीला चालना; वेदिका परब यांच्या हस्ते बक्षीस वितरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here