सिंधुदुर्ग
Amboli Monsoon Marathon 2026: आंबोली मॅरेथॉनची दिमाखात सांगता; पर्यटन आणि निरोगी जीवनशैलीला चालना
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ आंबोली येथे उत्साहात पार पडलेल्या आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ स्पर्धेची जल्लोषात सांगता झाली. सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका विशाल परब (Vedika Vishal Parab) आणि महाराष्ट्र भाजपचे युवा नेते विशाल परब (Vishal Parab) यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.

मॅरेथॉन ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून, निरोगी जीवनशैली, जिद्द आणि आत्मविश्वासाची परीक्षा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा तरी खेळ असणे आवश्यक असून, खेळामुळे आरोग्य उत्तम राहते आणि आयुष्य अधिक समृद्ध होते. आपण स्वतः खेळाडू असून अशा मॅरेथॉन स्पर्धांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, अशी आपली अपेक्षा आहे. आंबोलीतील निसर्गरम्य वातावरणात धावण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे. महिला आणि पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग ही या स्पर्धेची मोठी जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे महिलांचा सक्रिय सहभाग आणि त्यांचा उत्साह प्रेरणादायी असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सौ.वेदिका विशाल परब यांनी गौरवोद्गार काढले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ आंबोली येथे उत्साहात पार पडलेल्या आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ स्पर्धेची आज जल्लोषात सांगता झाली. सामाजिक कार्यकर्त्या सौ.वेदिका विशाल परब आणी महाराष्ट्र भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते या मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
Amboli Monsoon Marathon 2026: बक्षीस वितरण समारंभ संपन्न
या मॅरेथॉन स्पर्धेत 21 किमी खुलागट पुरूष प्रथम चैतन्य रूपनर (सांगली)व द्वितीय अभिषेक देवकाते (कोल्हापूर),21 किमी खुलागट महिला प्रथम साक्षी पवार (ठाणे) व द्वितीय ममता पाटील (सांगली),21 किमी 35 ते 45 वयोगट पुरूष प्रथम मल्लापा पुजारी (बेळगावी) व द्वितीय नंदेश गावकर (गोवा),21 किमी 45 ते 60 वयोगट पुरूष प्रथम सुनिल शिवणे ,द्वितीय अनंत तनकर,21 किमी 60 वर्षावरील पुरूष प्रथम उदय महाजन व द्वितीय विश्वनाथ शेटये (गोवा) ,21 किमी 35 ते 45 वयोगट महिला प्रथम नेत्रा सुतार (कोल्हापूर)व द्वितीय चित्रा सापळे (कणकवली),21 किमी 45 ते 60 वयोगट महिला प्रथम पल्लवी मूग ,द्वितीय कविता जाधव (सिंधुदुर्ग), 10 किमी खुलागट पुरूष प्रथम अनिकेत देशमुख (सांगली),द्वितीय संकेत पाटील (कोल्हापूर), 10 किमी खुलागट महिला प्रथम यामिनी ठाकरे (पुणे),द्वितीय दिक्षा जाधव (सिंधुदुर्ग),10 किमी 35 ते 45 वयोगट पुरूष प्रथम शंकर मगदूम व द्वितीय जगदिश शिंदे ,10 किमी 45 ते 60 वयोगट पुरूष प्रथम इराप्पा नाईक ,द्वितीय पवनकुमार अराल्लीगीदाद,10 किमी 60 वर्षावरील पुरूष प्रथम सतिश गावंडळकर व द्वितीय सुरेंद्र,10 किमी 45 ते 60 वयोगट महिला प्रथम द्राक्षायनी मुरगुड,द्वितीय माधुरी शिवदे,10 किमी 35 ते 45 वयोगट महीला प्रथम शांती देसाई (कुडाळ),द्वितीय प्रिती मनीष (मेंगलोर),10 किमी 60 वर्षावरील महिला प्रथम डाॅ अमृता वेजरे (देवगड),द्वितीय मालन कंटक आदींनी यश संपादित केले.
विविध वयोगटातील हजारो धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेत आरोग्य, फिटनेस आणि जिद्दीचा संदेश दिला. स्पर्धेनंतर विजेत्या धावपटूंना वेदिका विशाल परब यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.यावेळी बोलताना वेदिका विशाल परब यांनी यावेळी त्यांनी सर्व धावपटूंचे अभिनंदन करत, मॅरेथॉन ही केवळ अंतिम रेषा गाठण्याची स्पर्धा नसून, जीवनात संकटांवर मात करत पुढे जाण्याची प्रेरणा देणारा प्रवास असल्याचे सांगितले. आंबोलीसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळी अशा स्पर्धांमुळे पर्यटनालाही चालना मिळत असून, युवकांसह सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. यापुढेही अशाच आरोग्यदायी, प्रेरणादायी आणि पर्यटनाला चालना देणाऱ्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आयोजकांचे आणि सहभागी धावपटूंचे मनःपूर्वक कौतुक केले.
Amboli Monsoon Marathon 2026 : Amboli Monsoon Marathon 2026: Amboli Monsoon Marathon 2026









