Karde ST Bus Accident
Karde ST Bus Accident

गुहागर, रत्नागिरी

Karde ST Bus Accident : कर्दे येथे एसटी बसचा भीषण अपघात

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील कर्दे गावाजवळ मुंबई–दोडवली या एसटी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे.

Karde ST Bus Accident
Karde ST Bus Accident

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी एसटी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. बसमध्ये केवळ चालक आणि वाहक हे दोघेच उपस्थित होते.

अपघातात चालक आणि वाहक या दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

Karde ST Bus Accident Video

Video पहा – ▶️🎞️

अपघातामुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Google search engine
Previous articleDevsthan Inam Land Law: महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा; देवस्थान इनाम जमिनींसाठी नवा कायदा
Next articleAmboli Monsoon Marathon 2026: आंबोली मॅरेथॉनची दिमाखात सांगता; पर्यटन आणि निरोगी जीवनशैलीला चालना; वेदिका परब यांच्या हस्ते बक्षीस वितरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here