रत्नागिरी
राज्यात येणार दोन नवीन कायदे; ‘आधी मोजणी, मग नोंदणी’ आणि लँड टायटलिंग कायदा
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी डिसेंबर अधिवेशनात ‘आधी मोजणी, मग नोंदणी’ आणि लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याची घोषणा केली.

या नव्या व्यवस्थेनुसार मोजणीशिवाय कोणत्याही जमिनीची नोंदणी होणार नसल्याने बेकायदेशीर व्यवहार आणि जमिनीसंदर्भातील वादांना आळा बसण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच प्रत्येक जमिनीसाठी मालकाचे नाव, छायाचित्र, क्यूआर कोड, नकाशे आणि इतर सर्व आवश्यक माहिती असलेले एकत्रित डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देण्याची सरकारची योजना असल्याची माहितीही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.









