Khed POCSO Case
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात विश्वासाला तडा देणारी घटना समोर आली आहे. पोस्ट ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने एका कुटुंबाशी ओळख निर्माण झालेल्या नरेश बाबाजी मोरे (Naresh Babaji More) (वय ५६, रा. आस्तान, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा तसेच संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Khed POCSO Case मध्ये नेमकं के घडलं?
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या कुटुंबाशी परिचयाचा फायदा घेत आरोपीने पोस्ट ऑफिसमधील आरडीच्या पावत्या, आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रांच्या कामाचे कारण सांगून तिला आपल्या घरी बोलावल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, एप्रिल २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत मुलगी आरोपीच्या घरी गेल्यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार कोणालाही सांगितल्यास कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे पीडित मुलगी भीतीपोटी गप्प राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Khed POCSO Case ही घटना कशी समोर आली?
काही महिन्यांपासून मासिक पाळी न आल्याने संशय आल्यावर २८ जुलै २०२६ रोजी करण्यात आलेल्या गर्भधारणा चाचणीत मुलगी गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आईने विचारपूस केली असता पीडितेने आरोपीविरुद्ध कथित अत्याचाराची माहिती दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर पीडितेच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे खेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध POCSO कायदा तसेच इतर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा (Khed POCSO Case) दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे (Vivek Ahire) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Khed POCSO Case Video News
या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.









