नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, 75 वर्षानंतरही इथल्या अनेक नागरिकांना अगदी मुलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचं चित्र अनेकदा समोर येत आहे.देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये अगदी झपाट्याने विकास होत असताना काही गावं मात्र आजही मुलभूत सुविधांच्या प्रतिक्षेत आहेत. याचाच प्रत्यय देणारी एक घटना आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील हत्तीपाडा येथून समोर आली आहे.

नाशिकच्या हत्तीपाडा येथे रस्ताच नसल्याने रुग्णांना उपचारासाठी चक्क झोळीमध्ये न्यावं लागत असल्याची परिस्थिती आहे. सध्या समोर आलेल्या घटनेमध्ये एका गरोदर महिलेला नेण्यासाठी कुटुंबीयांनी ब्लँकेटची झोळी केली आहे आणि ते यातूनच महिलेला रुग्णालयात घेऊन जात आहेत.

गावातील असुविधांमुळे सहन करावा लागणारा हा त्रास समोर याव्यात हा त्यांचा उद्देश आहे . यामध्ये काही लोक एका महिलेला झोळीमध्ये टाकून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत.अशाप्रकारचं भीषण वास्तव दाखवणाही पहिलीच वेळ नाही आहे .तर या आधीही रस्त्याच्या समस्या दाखवणारे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. आणखी एका घटनेत रस्ता नसल्याने या भागात तीन वर्षापूर्वी सर्पदंश झाल्यामुळे एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यूही झाल्याचं ग्रामस्थांच म्हणणं आहे. प्रशासनाकडून या घटनेची सत्यता पडताळून याबाबत दखल घेण्याची गरज आहे. स्वांतत्र्याच्या 75 वर्षांनंतरही रस्त्याअभावी दिसणारं हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे.

Google search engine
Previous articleतुळशीची शेती घेऊन येईल श्रीमंती
Next articleपावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here