खेड: विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी रोखठोक भूमिका घेत थेट पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे.
शिंदे गटात सहभागी असलेले दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी ट्विट करीत शिवसैनिकांना आवाहन केले आहे.
योगेश कदम ट्विटमध्ये म्हणतात की,
सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..!
भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. मुळात तशी गरज ही पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.