पेण, रायगड – येक नंबर या मराठी चित्रपटाचा शो काल सर्वत्र प्रदर्शित झाला. रायगड जिल्ह्यातील मोरेश्वर चित्रमंदिर पेण येथील थिएटरमध्ये सुरुवातीचे पहिले दोन शो मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी मोफत बुक करून मराठी रसिक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची सुवर्ण संधी मिळवून दिली. यावेळी असंख्य मराठी बांधवांनी हा चित्रपट पाहण्यासाठी मोरेश्वर चित्रमंदिर मधील थिएटर मध्ये गर्दी केली होती.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मनसेने एक नंबर चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसाला मोफत तिकीट देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संदीप ठाकूर यांनी या शोच आयोजन केलं होतं. तर यावेळी येक नंबर चित्रपट येक नंबरच असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक वर्गाने दिली.