हिवाळा सर्वांच्या आवडीचा असा ऋतू, हिवाळ्यातील गुलाबी थंडी आणि छान हिरवेगार वातावरण साऱ्यांनाच आवडते. प्रत्येक ऋतू कोणता ना कोणता आजार घेऊनच येतो. ऋतूपासून तर वाचू शकत नाही पण आजारांपासून आपल्या आरोग्याचे नक्कीच सरंक्षण करू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने पाहायला गेलो तर खूप हितकारक असा हा ऋतू आहे. या दिवसात खूप भूक लागते आणि छान पचतेही. आपल्याकडे पालेभाज्या तसेच फळे हि उपलब्ध असतात परंतु गरज आहे आहाराची चौरस बनवायची…
- थंडी असल्याने या दिवसात आलं घातलेला चहा,ग्रीन टी,हर्बल टी तसेच भाज्यांचे सूप आणि जेवणामध्ये दह्याची कढी यांचा समावेश करावा.
2. तसेच या दिवसात बाजारातील ताज्या हिरव्या भाज्यांचा आहारात जास्त वापर करावा.हिरव्या भाज्यांमधली अ आणि क जीवनसत्त्वं थंडीत आरोग्यासाठी लाभदायी ठरतात.
3. फळांचा आरास या ऋतूत उत्तमच ठरते. संत्री, द्राक्षं अश्या फळांमध्ये क जीवनसत्त्वं असतं. यामुळे त्वचेचं पोषण होतं.
4. या ऋतूमध्ये मिळणारे लाल गाजर, नवलकोल अशा भाज्या पौष्टिक तर असतात. पण यामुळे थंडीपासून आपले रक्षणही होते. थंडीतल्या सर्दी, खोकला अशा आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येते.
5. या ऋतूमध्ये शक्यतो बाहेरचे तेलकट खाणे टाळावे. याने आपल्याला सर्दी,खोकल्यासारखे आजार जडू शकतात.