रत्नागिरी : अजूनही मॉन्सून स्थिरावलेला नसल्यामुळे जिल्हावासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार ९० गावांतील १८९ वाड्यांना १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार ४२२ लोकांना टँकरचे पाणी दिले जात आहे.
उशिरा दाखल झालेल्या मॉन्सून जिल्ह्यात स्थिरावलेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात वीस टक्केचे पाऊस झाला आहे. अधूनमधून सरीच पडत आहेत. दिवसा कडकडीत उन पडत असल्यामुळे या पावसाचा फायदा कातळावरील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना झालेला नाही. परिणामी अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. १८९ वाड्यांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. सर्वाधिक मागणी संगमेश्वर, खेडतालुक्यात आहे.