गुहागर, रत्नागिरी – समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे मेहुणे विपुल कदम (Vipil Kadam) गुहागर मध्ये सक्रिय झाल्याची दिसून येत आहेत. श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या माध्यमातून विपुल कदम यांनी गुहागर वासियांसाठी रुग्णवाहिका दिली आहे. रक्तदान शिबिराच्या आयोजनासह, नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे विपुल कदम यांच्याकडून आयोजन करण्यात आले. शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या मतदार संघात शिंदेच्या शिवसेनेचे विपुल कदम यांची दिमाखात एन्ट्री झाली आहे. विविध विकास कामाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचणार असल्याची प्रतिक्रिया विपुल कदम यांनी दिली आहे.