राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (DCM. Eknath Shinde) यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे मेहुणे श्री. विपुल लक्ष्मण कदम यांच्या सामाजिक व राजकीय नेतृत्वाची आवड तर कतृत्व पाहिल्यानंतर शिवसेना (Shivsena) या पक्षाच्यावतीने गुहगर विधानसभा मतदार संघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे गुहागर मतदार संघासह खेडमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून श्री. विपुल कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा देत आहेत.
श्री. विपुल लक्ष्मण कदम हे उदयोग व्यवसायनिमित्त मुंबई महानगरात असले तरी त्याचे मूळ गाव तळे, ता. खेड येथे असल्यामुळे कायम त्याची गावाला ओढ असून विशेष करून कोकणावर अत्यंत प्रेम आहे. आपल्या गावच्या बरोबर पंचक्रोशीचा विकास व्हावा या हेतूने त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम घेवून लोकउपयोगी कामे केली आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत गुहागर विधानसभा मतदार संघातून विपुल कदम हे उमेदवार मिळावेत म्हणून कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता. मात्र तेथील उमेदवारी राजेश बेंडल यांना मिळाल्यानंतर त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे निवडणुकीचा प्रचार यंत्रणा सांभाळून अगदी कमी कालावधीत चांगल्या प्रकारचे मताधिक्य मिळाल्याचे चित्र आपणाला पहावयास मिळाले होते. अत्यंत नम्र, विनयशिल, कायम वरिष्ठासह सामान्य कार्यकर्त्यांचा आदर ठेवणारे व्यक्तीमत्व म्हणजे विपुल कदम (Vipul Kadam) अशीच ओळख संपूर्ण कार्यकर्त्यांना आहे.