दापोली – दि.१५ ऑक्टोबर 2022 रोजी लोकमान्य ग्रंथालय आणि लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज चिखलगाव येथे वाचन प्रेरणा दिन आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम ग्रंथालयाचे सहसेक्रेटरी मा.अजित कांबळे सर यांनी वाचन प्रेरणा दिनाविषयी माहिती दिली. त्यानंतर ग्रंथालयाचे उपाध्यक्ष आणि प्रशालेचे मुख्याध्यापक मा. तुकाराम गरंडे सर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डाॕ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विषयी अधिक माहिती दिली.त्याचबरोबर १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन ही असल्याने मा. बि. डी. कांबळे सर यांनी याविषयी माहिती दिली. आणि त्याचे प्रात्यक्षिकही मुलांकडून करुन घेण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक – शिक्षकेतर तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी अधिक मेहनत घेतली.