उस्मानाबाद : लोहारा तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका १८ वर्षीय तरुणाने अंगणवाडीत शिकणाऱ्या ४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधमाने चाॅकलेट देण्याच्या बहाण्याने चिमुकलीला एका पडक्या वाडयात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पीडित मुलीने घरी आल्यानंतर आईला सांगितला

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीवर झालेल्या अत्याच्यारानंतर नराधम त्याच्या घरी निघून गेला. यानंतर पिडीत मुलगी घरी आल्यानंतर तिने तिच्या आईला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि ही घटना जिथे घडली तो पडका वाडा देखील दाखवला. घटनेनंतर पिडितेच्या कुटुंबातील लोकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. ही घटना काल सकाळी लोहारा तालुक्यातील एका खेडेगावात घडली आहे. ४ वर्षीय मुलीला वर्गातुन चाॅकलेटच्या बहाण्याने १८ वर्षीय तरुणाने अंगणवाडीच्या बाहेर आणले आणि चाॅकलेट देऊन एका पडक्या वाड्यात नेऊन या तरुणाने अत्याचार केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन १८ वर्षीय तरुणाच्या विरोधात तक्रार पोलिसांनी सदर घटनेची दखल घेतली आहे. अधिकारी रमेश बरकते, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश नरवडे, पोलीस उपनिरिक्षक आनंदराव वाठोरे आणि उपनिरिक्षक अनुसया माने यांनी अत्याचाराची घटनेची माहिती कळताच घडलेल्या घटनास्थळी भेट देऊन सर्व पाहणी केली. पोलीस उपविभागीय त्यानंतर पिडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन १८ वर्षीय तरुणाच्या विरोधात लोहारा पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.

Google search engine
Previous articleअनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरुच! पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम
Next articleजयगड जवळ समुद्रात आज सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here