भारतात आढळला सर्वात दुर्मीळ रक्तगट; देशातील पहिला तर जगातील फक्त दहावा व्यक्ती

- Advertisement -

सुरत: भारतात आतापर्यंतचा सर्वात दुर्मीळ रक्तगट सापडला आहे. आपल्याला आतापर्यंत ए (A), बी (B), ओ (O) आणि एबी (AB) हे फक्त चार रक्तगट माहिती होते. परंतु जो दुर्मीळ रक्तगट सापडला आहे तो ईएमएम निगेटिव्ह (EMM Negative) आहे.

गुजरातमधील राजकोट येथील 65 वर्षीय व्यक्तीच्या शरीरामध्ये हा दुर्मीळ रक्तगट सापडला आहे. या रक्तगटाचा हा देशातील पहिला आणि जगातील फक्त दहावा व्यक्ती आहे.

मानवाच्या शरीरामध्ये 42 वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड सिस्टम्स असतात. जसे की ए. बी, ओ. आरएच (RH) आणि डफी (Duffy). परंतु साधारणत: फक्त चार रक्तगट सर्वमान्य आहेत. ईएमएम निगेटिव्ह हा रक्तगट 42 वा ग्रुप सिस्टम असून हा रक्तगट असणाऱ्या लोकांच्या शरीरामध्ये ईएमएम हाय-फिक्वेन्सी अँटिजनची कमतरता असते.

गुजरातमध्ये सापडलेला व्यक्ती ह्रदयाच्या विकाराने पीडित आहे. या व्यक्तीवर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. परंतु रक्ताची चाचणी करण्यात आली तेव्हा त्यांचा रक्तगट जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट असल्याचे समोर आले. असे लोक दुसऱ्या लोकांचे रक्त घेऊही शकत नाहीत, आणि आपले रक्त कोणाला देऊही शकत नाहीत.

डॉक्टरांना तपासादरम्यान 65 वर्षीय व्यक्तीचा रक्तगट दुर्मीळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. ईएमएम निगेटिव्ह रक्तगट असणारे ते देशातील पहिलेच व्यक्ती आहेत. इंटरनॅशनल सोसाइटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजनने (ISBT) या रक्तगटाला ईएमएम निगेटिव्ह हे नाव दिलेले आहे.दरम्यान, जगातील सर्वात दुर्मीळ रक्ताचा प्रकार गोल्डन ब्लड हा आहे. हा रक्तगट असणारे जगामध्ये फक्त 43 लोक आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा रक्तगट असणाऱ्या लोकांवर उपचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असा व्यक्तींना रक्ताची गरज असते तेव्हा त्याचा शोध घेणे अवघड जाते. Rh फॅक्टर Null असणाऱ्या लोकांमध्ये गोल्डन ब्लड आढळते. 1961 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता. ऑस्ट्रेलियातील एका गर्भवती महिलेच्या रक्तचाचणीदरम्यान तिच्या शरीरात गोल्डन ब्लड असल्याचे समोर आले होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

12,546FansLike
75,569FollowersFollow
2,564FollowersFollow
191,558SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles