गुहागर : साडीच्या झोपाळ्याचा फास लागून १५ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना पालशेत येथील बाजारपेठ परिसरात शुक्रवारी १८जून’रोजी रात्री घडली . निहाल सुभाष जाक्कर असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता ८ वी मध्ये शिकत होता.
या घटनेची माहिती जितेंद्र दत्ताराम वायंगणकर रा. पालशेत यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली. त्या माहितीनुसार जितेंद्र वायंगणकर हे पालशेत बाजारपेठेतील सावरकर पेठ येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी त्यांची पत्नी अपेक्षा , मुलगी श्रेया आणि आत्तेभाऊ सुभाष जाक्कर त्यांची पत्नी शकुंतला व त्यांची मुले सृष्टी, स्वराज व निहाल अशी दोन कुटुंबे एकत्र राहतात. महिनाभरापूर्वी मुलांना खेळण्याकरिता घरच्या माळ्यावर जितेंद्र वायंगणकर यांनी नायलॉन साडीचा झोपाळा बांधला होता. या झोपाळ्यावर श्रेया, स्वराज आणि निहाल रोजच खेळायचे .
आकस्मिक मृत्यू ची नोंद
जितेंद्र वायंगणकर यांचे साखरी आगार ता. गुहागर येथे बेकरीचे दुकान आहे. वायंगणकर रात्री ९ वाजता बेकरीतील काम आटोपून घरी आले त्याचवेळी त्यांचा मित्र नंदकुमार धोपावकर त्याचा त्यांना फोन आला होता. त्यांच्याशी फोनवर बोलत जितेंद्र वायंगणकर घरच्या माळ्यावर गेले. तिथे त्यांच्या भावाचा मुलगा निहाल नायलॉन साडीच्या झोपाळ्यात गुरफटलेला दिसला. निहालच्या मानेला साडीचे वेटोळे होते तर पाय लोंबकळत होते. तातडीने त्यांनी सुभाष ला बोलावले. दोघांनी नायलॉन साडीच्या झोपाळ्यात अडकलेल्या निहाल ला सोडवायला सुरुवात केली. निहालला माळ्यावरून खाली आणून पाळशेतमधील डॉ. ढेरे यांच्याकडे यांच्या खासगी दवाखान्यात नेले असता डॉ. ढेरे यांनी निहाल यास मृत घोषित केले.
चिमुकल्या निहारच्या दुर्दैवी मृत्यूने पालशेतमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपस गुहागरचे प्रभारी पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.