मुंबई – गोवा महार्गावरील वाहतूक 16 तासांपासून ठप्प

- Advertisement -

मुंबई : मुंबई – गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. या मार्गावरुन प्रवास करताना तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण गेल्या 16 तासांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद आहे. मुंबई गोवा महामार्गावर लांजा नजिक LPG टँकरला भीषण अपघात झाला आणि यातून वायू गळती झाल्याने हा महामार्ग बंद पडला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर लांजा येथील अंजणारी पुलाजवळ टँकर कोसळून अपघात झाला आहे. एलपीजी गॅसचा टँकर नदीत कोसळला आहे. या अपघातामुळे नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात टँकरची गळती सुरु झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 16 तासांपासून बंद असल्याने अनेक वाहनांने या मार्गावर अडकून पडली आहेत. या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यास 4 ते 5 लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तर लांजावरुन मुंबईकडे येणारी वाहतूक लांजा-शिपोशी-दाभोळे मार्गे वळवली आहे. दुसरा पर्यायी मार्ग लांजा-हरचेरी-काजरघाटी मार्गे रत्नागिरी कढून हातखांबा मार्गे वळविण्यात आली आहे.

LPG गॅस काढण्यासाठी लागणारा दुसरा टँकर घटनास्थळी दाखल झाला आहे. तज्ज्ञांची टीम उरण आणि गोव्यावरून दाखल झाली आहे. या टीमकडून सर्व्हे सुरु आहे. सर्व्हेनंतर गॅस कसा शिफ्ट करायचा निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत पर्यायी मार्गानं वाहतूक वळविण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर LPG टँकरला भीषण अपघात झाल्याने. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्ग रात्रीपासून बंद आहे. भरधाव वेगात आलेला हा टँकर पुलाचा कठडा तोडून लांजानजिकच्या काजळी नदीत कोसळला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरु असल्यानं महामार्गावरील वाहतूक तत्काळ बंद ठेवण्यात आली. आता याठिकाणी तज्ज्ञांची टीम उरण आणि गोव्यावरून दाखल झालीय. वाहतूक सुरू करण्याचं काम सुरु आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

12,546FansLike
75,569FollowersFollow
2,564FollowersFollow
191,558SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles