जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हा लेखाधिकारी म्हणून कामकाज करणाऱ्या सौ.स्वाती सुधीर देवळेकर या नियत वयोमानानुसार माहे नोव्हेंबर २०२४ अखेर म्हणजे दिनांक २९/११/२०२४ रोजी सेवा निवृत्त झाल्या.
३७ वर्ष शासकीय सेवा बजावत त्यांनी लिपिक पदापासून उपकोषागार अधिकारी तसेच के.के.व्ही.दापोली येथे सहायक लेखाधिकारी व तपासणी अधिकारी म्हणून अलिबाग येथे कामकाज केले व गेली ३ वर्ष जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे लेखाधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे.
रविवार दिनांक ०१/१२/२०२४ रोजी दुपारी १२ .१५ वाजता श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर शिवतर रोड खेड येथे श्री.स्वामी समर्थ भक्त परिवार मित्र परिवार यांचे वतीने घेण्यात आलेल्या सेवा निवृत्ती सोहळा वेळी प्रथम त्यांची आई श्रीमती चंद्रभागा आंबेकर यांचे हस्ते शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच कार्यक्रम साठी उपस्थित मित्र परिवार यांनी सौ.देवळेकर मैडम यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी श्री.नाना नांदगावकर,सौ.संध्या पुळेकर मैडम ,श्री. विजय सकपाळ सर, अँड.संतोष कोठारी साहेब,श्री.दशरथ मोरे साहेब, रोहीदास समाज जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश खेडेकर, माजी अध्यक्ष श्री चंद्रकांतजी देवळेकर सौ.साळवी मैडम,सौ. प्रियंका बेलोसे के.के.व्ही.दापोली , इत्यादी ने आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी क्षेत्र अक्कलकोट येथे सोमवार दिनांक ०२/१२/२०२४ रोजी पासून पायी वारी साठी निघालेले श्री स्वामी भक्त श्री संदीप सासने यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रम प्रस्तावना श्री महेश आंबेकर यांनी केली तर कार्यक्रम सांगता प्राध्यापक डॉ.आनंद आंबेकर यांनी केले