रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज, शनिवारी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली.

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते हे ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रांताधिकारी रत्नागिरी विकास सूर्यवंशी, रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव आदिंची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ठिकाणी विविध शाळांचे व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक उपस्थित होते. त्यामुळे प्रांगण फुलून गेले होते.राष्ट्रध्वज वर जाताना उपस्थित रत्नागिरीकरांनी स्वातंत्र्याचा जयघोष केला. सर्वांनी आपापल्या हातातही तिरंगा सन्मानाने धरला होता. त्याच वेळेस मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र, उपस्थितांचा उत्साह कमी झाला नाही. एक बाजूला आकाशातील पाऊस आणि त्याखाली तिरंग्याला वंदन करीत राष्ट्रभक्तीचा पाऊस असे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी पोलीस दलाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. भर पावसात चिंब भिजत महाविद्यालयीन युवतींनी जयगान यावेळी सादर केले. क्रीडाधिकारी कार्यालयातील स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आले.

Google search engine
Previous articleब्लँकेटची झोळी करून गरोदर महिलेला रुग्णालयात नेलं; नाशिकमधील मनाला चटका लावणारं दृश्य
Next articleअपघातात अकाली मृत्यू! आंदोलनांचा बुलंद आवाज हरपला …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here