वाढत्या बालविवाहाबाबत चिंता व्यक्त करत न्यायालयाने सरकारचे कान टोचल्यानंतर बालविवाह प्रतिबंध कायद्याची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे.बालविवाह प्रतिबंध कायद्याची व्याप्ती आता दोन कुटुंबापुरती मर्यादित न ठेवता त्याचा आवाका वाढविण्यात आला आहे. आता गावात बालविवाह झाल्यास   सरपंच, पोलीसपाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.  हे एवढ्यावरच न थांबता राज्य सरकारने त्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार, , बालविवाह झाल्यास नववधू-वराचे आई-वडिल, मंगल कार्यालयाचे मालक, पुरोहित आणि छायाचित्रकार यांच्यावर गुन्हा दाखल होत होता. मात्र आता कायद्याची व्याप्ती वाढवत यामध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिका-यांचा समावेश करण्यात आला आहे. बालविवाह कायद्यान्वये कुटुंबासोबतच पुढारी रडारवर आले आहेत. त्यांच्यावर केवळ गुन्हा दाखल  होणार नसून त्यांना पदावरुन ही पायउतार व्हावे लागणार आहे.

Google search engine
Previous articlePraesent quis lectus a urna scelerisque pellentesque
Next articleराष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा; नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here