एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार २८ टक्के महागाई भत्ता; घरभाडे भत्त्यातही होणार वाढ; उपोषण मागे

- Advertisement -

मुंबई – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांना (ST employees) शासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देण्याचा आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. याच बरोबर, विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संयुक्त कृती समितीने पुकारलेले राज्यव्यापी उपोषण मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून राज्यभरातील एसटीची वाहतूक सुरळीतपणे सुरू होणार आहे.

एसटी महामंडळातील श्रमिक संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने दि. २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी आज मंत्रालयात संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे, कर्मचारी व औद्योगिक संबंध खात्याचे महाव्यवस्थापक माधव काळे, वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक सुहास जाधव, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर आदी उपस्थित होते. या बैठकीत एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडणार आर्थिक भार याचा ऊहापोह करत मंत्री ॲड. परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे, हनुमंत ताटे, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) मुकेश तिगोटे, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर, कास्ट्राईब रा. प. कर्मचारी संघटनेचे सुनील निरभवणे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे श्रीरंग बरगे, महाएसटी कामगार काँग्रेसचे (इंटक) दादाराव डोंगरे यांचा समावेश होता.

१९० आगार पूर्णपणे बंद –
एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला दुसऱ्या दिवशी जास्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील २५० आगरांपैकी १९० आगार पूर्णपणे बंद होते. संघटनाच्या कृती समितीच्या उपोषणाचा दैनंदिन प्रवासी फेऱ्यांवर मोठा परिणाम झाला होता.

एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांची वा‍र्षिक वेतनवाढ २ टक्क्यावरुन ३ टक्के करण्यात यावी करण्याची मागणी करण्यात आली होती. या वेतनवाढीसंदर्भात आपण सकारात्मक असून दिवाळीनंतर याबाबत बैठक घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री तथा अध्यक्ष एसटी महामंडळ ॲड. अनिल परब यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

12,546FansLike
75,569FollowersFollow
2,564FollowersFollow
191,558SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles