चिपळूण : तालुक्यातील टेरव वेतकोंड वाडी एसटी बसला अपघात झाल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.एसटी बसवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या एका बाजूला जाऊन अडकली. यामध्ये दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच टेरव गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एसटी आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांना अपघाताची माहिती देण्यात आली.

दररोज सकाळी टेरव वेतकोंडवाडी येथे चिपळूण आगारातून बस सोडली जाते. या गाडीला विद्यार्थी व अन्य प्रवाशांची नेहमी गर्दी असते. तेव्हा सुस्थितीत असलेली एसटी बस द्यावी. अपघातग्रस्त एसटी बस अत्यंत वाईट व नादुरुस्त परिस्थितीत आहे. याबाबत मुखमंत्री एकनाथ शिंदे, आमदार शेखर निकम यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे किशोर कदम यांनी सांगितले.

Google search engine
Previous articleरत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळली,12 तासांपासून वाहतूक ठप्प, 15 दिवसातील तिसरी घटना
Next articleनव्या सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, सुप्रिया सुळेंचा थेट पंतप्रधानांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here