कुडाळ येथून पणजी येथे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली घाटीत अपघात झाला. गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यात काही महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. दुपारी ३.३० च्या सुमारास हा अपघात झाला. ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला.

Google search engine
Previous articleगुहागर विधानसभा मतदार संघाच्या समन्वयकपदी तरूण उदयोजक विपुल लक्ष्मण कदम यांची निवड
Next articleविवाहितेचा सासरवाडीकडून मानसिक व शारीरिक छळ; दागिने आणि पैशाची सासरवाडीकडून मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here