सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या परजिल्ह्यातून फळविक्रेते मोठ्या संख्येने दाखल झालेत. हे फळविक्रेते महामार्गाच्या बाजूला किंवा बाजारपेठेपासून लम्ब अंतरावर आपले वाहन लावून फळांची विक्री करतात. यामध्ये सफरचंद, चिकू, पेरू, डाळिंब, संत्री, द्राक्ष यांची कमी किमतीत विक्री करतात. त्यामुळे स्थानिक नागरिक सुद्धा या फळांची खरेदी करतात. पण ही फळे निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले आहे. कुडाळ शहरापासून जवळच्या पिंगुळी गावात आज फळविक्रीसाठी आलेल्या या परजिल्ह्यातील विक्रेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पिंगुळीवासियानी पर्दाफाश केला. पिंगुळी भागात आलेला विक्रेता निकृष्ट दर्जाची फळे विक्री करीत होता. या फळांना किडे पडून त्यावर बुरशीसुद्धा आली होती. याबाबत सेना कार्यकर्ते आणि नागरिकांनी फळ विक्रेत्यांना कुडाळ पोलीस स्टेशन येथे आणून ताब्यात दिले.