मुंबई – गोवा महामार्गावर कणकवली येथील तळेरे येथे ओव्हर ब्रिजवर अज्ञात वाहनाची धडक बसून एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मार्गावर बॅरिकेट्स लावून ठेवून बैलाचा मृतदेह तसाच मार्गावर उन्हात तापत असलेला दिसून आला. तर दुसरीकडे मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या लेंनवर या भटक्या मुक्या जनावारांनी ठिय्या मांडल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे मार्गावरील या भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहन चालकांमधून केली जात आहे.