श्रीवर्धन तालुक्यात मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरु असून विकासकामासाठी मोठ्याप्रमाणात लागणारी दगड, खडी क्रश सॅन्ड आदि आवश्यकता असल्याने अनेकजण नवनवीन ठिकाणी शासकीय परवानग्या न घेता शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृत खाणी सुरु झाल्याचं दिसून येत आहे . खाणी हद्दीतील गावच्या प्रमुख नागरिकांना अमिश दाखवून मोठ्या प्रमाणात उत्तखनन केलं जातं असल्याच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यासाठी तालुक्यात अनेक एजंटचा सुळसुळाट सुरु आहे. शासकीय अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच आता बोललं जात आहे.