वसई / मुंबई : पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. खासदार, आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात सहभागी झाले आहेत. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

पालघर जिल्ह्यात शिवसेनेत मोठी फूट पडली असून खासदार आमदारांसह जिल्हाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवक ,जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य शिंदे गटात सामील झाले आहेत.

खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा,जिल्हाप्रमुख राजेश शहा, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्यासह जिल्ह्यातील काही नगर पंचायतीचे नगरसेवक, पंचायत समिती सभापती, सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त शिंदे गटात आता सहभागी होणार आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण जिल्ह्यात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी बाहेर पडले आहेत.

Google search engine
Previous articleकेरळ सरकार देणार इंटरनेटचा मानवी हक्क; 20 लाख नागरिकांना मिळणार फ्री Wi-Fi
Next articleआईला म्हणाला, तुला माझा त्रास होणार नाही; २ दिवसांनी नायट्रोजन वापरुन आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here