फडणवीस नशीबवान; अडीच वर्षांत ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही झाले; ‘दादां’चा टोला

- Advertisement -

मुंबई :विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली.

तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर अभिनंदनपर भाषणादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांना मिश्किल टोला लगावला.

“मी अनेकदा देवेंद्र फडणवीसांना इथे भाषण करताना पाहिलं. पण आज तो उत्साह दिसत नव्हता. यावेळी जे विधीमंडळात आमदार निवडून आले, त्यात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. अडीच वर्ष झाली, अडीच वर्ष शिल्लक आहेत. अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमत्री पण झाले आणि विरोधी पक्षनेतेही झाले. कोणतंही पद ठेवलं नाही. सर्व महत्त्वाची पदं ही त्यांनी भूषवली,” असं म्हणत अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली.

काय म्हणाले फडणवीस?

मविआचं सरकार आलं तेव्हाच मी सांगत होतो हे सरकार अनैसर्गिक आहे, हे टिकणार नाही. माझी खूप टिंगल टवाळी झाली. मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. अनेकांनी टिंगल टवाळी केली. मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. ज्यांनी टिंगल टवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार. माझा बदला एवढाच की मी त्यांना माफ केलं. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हर एक का मौका आता है, असं फडणवीस म्हणाले.

मविआचं शतक हुकलं

भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडलेला विश्वास प्रस्ताव जिंकला आहे. शिंदें गट आणि भाजपाच्या सरकारच्या बाजूने विधानसभेतील १६४ आमदारांनी पाठिंबा देत मतदान केले. तर महाविकास आघाडीचे विधानसभेतील संख्याबळ आज अजून घटल्याचे दिसून आले, महाविकास आघाडीच्या बाजूने विश्वासमत प्रस्तावाविरोधात केवळ ९९ आमदारांनी मतदान केलं. तर सपा आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

12,546FansLike
75,569FollowersFollow
2,564FollowersFollow
191,558SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles