देशातील राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर लागले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासाठी विरोधकांची मुठ बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. ‘शरद पवारांना जर राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केले, तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल’, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.