औरंगाबाद शहर नशेखोरांच्या गर्तेत जात आहे. मागील तीन महिन्यात वाढलेल्या गुन्हेगारी नंतर शहरातील नशेखोरीवरून चिंता व्यक्त केली गेली. त्या नंतर सतर्क झालेल्या शहर पोलिसांनी कंबर कसली असून, आता या नशेखोर एजंटला शहरातीलच मेडिकल चालक मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या विशेष पथकाने पकडलेल्या नशेखोराच्या चौकशीत वाळूज, पंढरपूर येथील तीन बडे मेडिकल चालकांचे नाव समोर आले आहे.
पोलिसांना सापळा रचला
यापूर्वी परभणीच्या बड्या रुग्णालयाचे या रॅकेटमध्ये नाव समोर आल्यानंतर 17 जून रोजी पथकाचे सहायक निरीक्षक मोहसीन सय्यद, सहाय्यक पोलिस निरिक्षक नंदकुमार भंडारे यांना गुप्त बातमीदारातर्फे लांजी रोडवर तारासिंग जगदिशसिंग टाक (20 रा. अलाना कंपनी जवळ, गेवराईतांडा ता. जि. औरंगाबाद) हा लांजी रोडवरील शिव मेडिकल येथून नशेच्या गोळ्या खरेदी करून अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. अधिकऱ्यांनी सापळा लावून शुक्रवारी तारासिंगला गोळ्या विकण्यासाठी ग्राहकांची वाट पाहत असताना पकडल्याने त्याच्या ताब्यात 248 गोळया ALPRACAN 0.5 सापडल्या आहेत.
चौकशीत सांगितली नावे
तारसिंग पोलिसी खाक्या दाखवताच नशेसाठी गोळ्या एजंट कडून नाही तर त्याच परिसरातील शिव मेडिकल येथून आणत असल्याचे सांगितले. त्या नंतर पथकाने शिव मेडिकलची तपासणी केली. तेव्हा मेडिकलचा मालक शिवप्रसाद सुरेश चनघटेकडे 75 गोळया ALPRACAN 0.59 08 किट ज्यावर Gestapro kit आढळून आल्या. महेश उणवने त्याला पुरवत असल्याचे सांगिताच पथकाणे रात्रीतून त्यालाही ताब्यात घेतले. सर्व औषधी तो वैजापूरवरून पुरवत असल्याचे सांगितले. त्यामुळे नशेखोरांचे रॅकेट आता ग्रामीण भागात पोहोचत असल्याचेही समोर आले आहे. उनवणे कडे 1725 गोळया ज्यावर ALPRACAN 0.5, 220 किट ज्यावर Gestapro kit, 1120 किट गोळया ज्यावर Suhagra-100 Tablets) 100 Tablets मिळून आल्या.
व्यावसायिकांमध्ये खळबळ
चौकशीत शिव मेडिकल शिवाय लांजी रोडवरील तनुजा मेडिकल तसेच वाळूज पंढरपूर येथील लाइफलाइन मेडिकलमधून आणत असल्याचे सांगितले. त्यामुळे या रॅकेटमध्ये आता आणखी मेडिकल चालक अडकण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेचे गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहसीन सय्यद, सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार भंडारे, अंमलदार सय्यद शकील, प्रकाश गायकवाड, आनंद वाहुळ , प्राजक्ता वाघमारे, दत्ता दुभाळकर यांनी अन्न औषधी निरिक्षक बळीराम मरेवाड, अंजली मिटकर यांच्या मदतीने ही कारवाई केली.